Thursday 16 April 2020

शेअर मार्केट ची संपूर्ण माहिती

शेअर मार्केट म्हणजे काय ?
शेअर मार्केट म्हणजे असे ठिकाण जिथे शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते. समजा रिलायन्स इंडस्ट्रीज लि. या कंपनीच्या शेअरचा भाव आत्ता 1200 रुपये आहे आणि आपण त्याच्या 10 शेअरची खरेदी केली तर आपण त्या कंपनीचा शेअर होल्डर (Share Holder) म्हणजेच समभाग धारक झालो आणि त्या कंपनीमध्ये आपली 1200 रुपये गुंतवणूक (Investment) झाली. कंपनी जसजशी वाढत जाते तसतशी शेअर्सची किंमतही वाढत जाते आपल्याला हव तेव्हा ते शेअर्स विकून नफा मिळवता येतो. शेअर्सच्या या खरेदी विक्रीला ट्रेडिंग (Trading) असे म्हणतात. शेअर्सच्या किंमतीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. शेअर्सची किंमत कधी वाढते तर कधी ती कमी सुध्दा होऊ शकते. दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीत बाजारातील चढ उताराचा फार फरक जाणवत नाही.

शेअर बाजारात कमीत कमी किंवा जास्तीत जास्त अशी कोणतीच गुंतवणुकीची मर्यादा नसते. आपल्याकडे असणाऱ्या पाचशे ते हजार रुपयांपासून ते अगदी लाखो-करोडो रुपयांपर्यंतची सुद्धा गुंतवणूक शेअर बाजारात करता येते. ही सर्व खरेदी-विक्री स्टॉक एक्सचेंज (Stock Exchange) मार्फत होते BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) ही दोन भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंजेस आहेत. या दोन्ही स्टॉक एक्सचेंज मध्ये मिळून जवळपास 5,000 कंपनी नोंदणीकृत आहेत त्या सर्व कंपनीच्या शेअरची खरेदी आपल्याला करता येते. शेअर मार्केट संदर्भातील सर्व व्यवहारांवर सेबीचे (SEBI) Securities and Exchange Board of India नियंत्रण असते व या व्यवहारांमध्ये काही गैरप्रकार आढळल्यास त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार देखील सेबीकडे असतो.

शेअर्सची खरेदी थेट स्टॉक एक्सचेंज मधून न होता ती दलालांमार्फत होते. दलाल म्हणजेच स्टॉक ब्रोकर्स (Stock Brokers) हे ब्रोकर्स स्टॉक एक्सचेंज आणि गुंतवणूकदार यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग चालू करण्यासाठी या ब्रोकर्स कडे डिमॅट (dmat) अकाउंट उघडावं लागेल.


भारतामध्ये सध्या अनेक स्टॉक ब्रोकर्स कार्यरत आहेत त्यापैकी कोणत्याही ब्रोकरकडे डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट काढून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग चालू करता येते. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी पॅन कार्ड (Pan Card)आणि बॅंकेत खात (Bank Account) असणं बंधनकारक आहे.